Pune District : केशव सोनवणेची राज्यस्तरीय प्रोजेक्टसाठी निवड
Updated On:

भोर : राजगड ज्ञानपीठ संचलित टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक, संगणक विभागातील तृतीय वर्षातील केशव चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्याची भारती विद्यापीठ पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रोजेक्ट कॉम्पिटीशनमध्ये निवड करण्यात आली.
राज्यभरातून डिप्लोमा आणि डिग्रीमधून एकूण ६० सहभागी स्पर्धकांमधून निवडलेल्या बेस्ट १० प्रोजेक्टमध्ये सोनवणेची निवड करण्यात आली.
राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष, माजी आमदार संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी यशस्वी विद्यार्थी केशव सोनवणे, प्राचार्य ज्ञानेश्वर खोपडे, इस्टेट मॅनेजर राहुल खामकर व प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन केले.





