पुणे जिल्हा : राजगड तालुक्यामध्ये भातकाढणीला आला वेग

विंझर – वेल्हे (राजगड) तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्याने प्रामुख्याने भातशेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे तालुक्याला भातशेतीचे केंद्र असे देखील संबोधले जाते. अशा या तालुक्यामध्ये गावोगावामध्ये भातकाढणीला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे.
तालुक्यातील अनेक शेतकरी दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून भातकाढणीसाठी गावी येऊन मोठ्या उत्साहाने भात काढणी करत आहेत.
तर तालुक्यातील बर्याच काही भागातील भातरोपांवर रोग, रानडुकरांनी केलेले नुकसान तसेच अवकाळी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भातपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे वेल्हे (राजगड) तालुक्यातील अनेक शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आल्याने तालुकयातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जरी भातकाढणीला तालुक्यामध्ये वेग आला असला तरी मात्र तालुक्यावर भातपिक नुकसानीचे यावर्षी मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे वेल्हे (राजगड) तालुक्यातील शेतकर्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.





