Pune District : वाघोलीकरांकडून मंत्री नितेश राणे यांचे स्वागत
Updated On:

वाघोली : वाघोली (ता. हवेली) येथे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी वाघोलीचे नेते पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप सातव, वाघोली भाजप शहराध्यक्ष कल्पेश जाचक, मुन्नाभाई राखपसरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपारिक वेशभूषेचा आधार घेत मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.
वाघोलीकरांच्या वतीने वाघोलीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना तसेच नागरिकांना भेट देत राणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. वाघोलीत नितेश राणे हे पहिल्यांदाच आल्याने वाघोलीकरांमध्ये मोठा उत्साह संचारला असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.





