Pune District: मार्च महिना हुश्श.. वसुली सुरू आहे

पळसदेव : सध्या मार्च महिना सुरु आहे त्यामुळे सर्वच विभागात आपापले टार्गेट पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. महत्वाचं म्हणजे वसुली, अशीच वसुली सध्या महावितरण विभागात सुरु आहे.
महावितरणचे कमर्चारी सध्या घरगुरी व व्यावसायिक बिलाची जोरदार वसुली करत आसलेच पाहावयास मिळत आहे. बिल थकीत ग्राहकांच्या घरी दुकानात जाऊन बिल वसुली करत आहेत.
पळसदेव गावातून महावितरण कर्मचारी सकाळ पासूनच गावातील बाजारपेठेतील दुकानदार, घरगुती ग्राहक याना प्रत्यक्षात भेटून वसुली करत आहे. काहीही करा मार्च महिना सुरु आहे. बिल भरावाच लागतंय आस सांगून थकीत व्यापारी व घरगुती ग्राहक यांच्याकडून वसुली करत आहेत.
त्यामुळे सध्या महावितरण वसुलीच्या मोडवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या वेळी वायरमन उमेश काळे म्हणाले, मार्च महिना आहे आमच्यावर वसुलीचा खूप दबाव आहे. नागरिकांनी आपले थकीत बिल भरून सहकार्य करावे.





