पुणे जिल्हा : इंदापूरातून लाखो मराठे पुण्यात येणार

चहा, चहा, नाश्तासह वेळेचे काटेकोर नियोजन
पळसदेव : मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि. 11) मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहेत.
त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यात इंदापूर तालुक्यातून लाखो मराठा समाजाचे बांधव मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती मराठा संयोजकांनी दिली.
इंदापूर तालुक्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला मोठ्या प्रमाणात तालुक्यातून मराठा समाज बांधव सहभागी होण्यासाठी गेल्या आठ दहा दिवसापासून संयोजकांच्या गाव गावात नियोजन बैठका सुरु होत्या यामधून जाण्यासाठी गाड्या व चहा, नाश्ता व पुण्यात पोहोचल्यावर गाडी पार्किंग व वेळेचे काटेकोर नियोजन करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील गावगावांतून हजारो मराठे सकाळी पहाटेपासूनच पुण्याकडे प्रस्थान करणार आहेत.





