पुणे जिल्हा : खेड-आळंदी मतदारसंघाचे विभाजन होणार

आमदार मोहिते : डेहणेत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत रोड शो
खेड तालुका मनसेने दिला मोहितेंना पाठिंबा
राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होणार असून पुढील 2029 च्या निवडणुकीत दोन मतदारसंघ होतील यात एक महिला आणि एक आदिवासी समाजासाठी राखीव असतील. कदाचित माझी या मतदारसंघातील ही शेवटची निवडणूक असेल, असे प्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने डेहणे (ता. खेड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. यावेळी उमेदवार दिलीप मोहिते पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे महेश मोदी, निर्मला पानसरे, शरद बुट्टेपाटील, राम गावडे, कैलास सांडभोर, सनी मानकर, समीर थिगळे,अरुण चांभारे, शांताराम भोसले, दिलीप नाईकनवरे, सुरेश शिंदे,लता गोपाळे, नवनाथ होले, विलास कातोरे, शांताराम चव्हाण, संध्या जाधव, कांचन ढमाले,
वैशाली जाधव, मंगल चांभारे, संजय रौंधळ, विट्ठल वणघरे, हनुमंत कड, जयसिंग भोगाडे, कमल कड, दशरथ गाडे, विशाल पोतले, सुगंधा शिंदे,सिध्दार्थ कांबळे,पपू बनसोडे, लक्ष्मण तिटकारे, रामदास माटे, सुजाता पचपिंड, दत्ता खाडे, वैभव नाईकरे, सरपंच मिना लांघी, लक्ष्मण मुके, इजाज तांबोळी, सखाराम शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमदार दिलीप मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. सरपंच मिना लांघी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास माटे यांनी तर दत्ता खाडे यांनी आभार मानले.
खेड-आळंदीचा कणा म्हणजे आमचा दिलीप आण्णा’..! दिलीप मोहिते पाटील या विधानसभेचा कणा असून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन कणा आपल्याला मजबूत करायचा आहे. मोहिते पाटील देवाच्या रुपाने तालुक्याला आमदार म्हणून लाभलेले आहेत. आदिवासी बांधवांना न्याय देणारा हक्काचा माणूस दिलीप मोहिते पाटील यांच्या रूपाने भेटला आहे. त्यांना मंत्री करण्यासाठी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने पाठिशी उभे रहा.
– सयाजी शिंदे, अभिनेता, स्टर प्रचारक, राष्ट्रवादी काँग्रेस
भोरगिरी ते भीमाशंकर हा एलिव्हेटेड पूल बांधणार..
पेंच अभयारण्याच्या धर्तीवर भोरगिरी ते भीमाशंकर हा एलिव्हेटेड पूल बांधणार आहे. भीमाशंकर खेड तालुक्याची अस्मिता आहे. तेथे जाण्यासाठी हा एलिव्हेटेड पूल बनविणार. आदिवासी भागाचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पदरवाडी गावचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आमदार मोहितेंनी नमूद केले.





