पुणे जिल्हा : जुन्नरच्या हक्काचे पाणी जाऊ देणार नाही

आमदार बेनके : मांडवे-कोपरे येथे प्रचारार्थ कोपरा सभा
ओतूर – महाविकास आघाडीचे नेते डिंभे-माणिकडोह बोगदा करून आपल्या जुन्नर तालुक्याचे हक्काचे पाणी घेऊन जाण्याच्या ज्या वल्गना करत आहे. ते पाणी अतुल बेनके जिवंत असे पर्यंत त्यांना नेऊ देणार नसल्याचा इशारा, महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मांडवे-कोपरे येथे झालेल्या कोपरा सभेत आमदार बेनके बोलत होते. यावेळी दौर्यात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे , पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, पुणे जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पुजा बुट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे, आदिवासी नेते काळु शेळकंदे, मारुती वायाळ, विनायक तांबे, सरपंच दामू गोडे , कोपरे सरपंच रोहिणी माळी, सरपंच भिमराव मुठे, भाऊसाहेब साबळे,
खुबी सरपंच विजय काटे, शंकर माळी, तळेरान सरपंच गोविंद साबळे, फसाबाई कवठे, दीपक मुठे, राजू गायकर, तुकाराम जोशी, संजय पोकळे, तुकाराम जोशी, बबन गभाले, लक्ष्मण पोफले ,दारकू पोफळे,राहुल सोनवणे सचिन देठे, संतोष गमाले, शंकर पोफळे,भास्कर तातळे, अंकुश ढोंगिरे, किसन दुदे, आकाश पोकळे, दादाभाऊ वरे, मारुती गभाले यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोपरे, मांडवे, मुथाळणे, पुताची वाडी, जांभुळशी दौर्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आमदार अतुल बेनके यांचे स्वागत करून मताधिक्क्य देण्याचे ठरवले आहे.
आमदार बेनके म्हणाले की, कोपरे मांडवे परिसरासाठी खास बाब म्हणून एम आय टँक बंधारा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर केले आहेत. तर उर्वरित एमआय टँक बंधारा करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करणार आहे. जुन्नर तालुक्यात जल सिंचनाची क्रांती स्व. वल्लभ बेनके यांच्यामुळे झाली असून सिंचनाची 90 टक्के कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित 10 टक्के कामे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.त
आमदार अतुल बेनके यांनी आदिवासी भागातील अनेक प्रश्न सोडवले असून हिरडा कारखाना सुरू करण्यासाठी 12 लाख कोटींची तरतूद केली आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी एमआय टँक पूर्ण करून स्व. वल्लभ बेनके यांचे स्वप्न पूर्ण करा. जुन्नरच्या विकासासाठी अजित पवार यांच्याबरोबर जाऊन इतर मतदारसंघांपेक्षा सर्वात जास्त निधी आणला याचा सार्थ अभिमान आहे.
– मारुती वायाळ, आदिवासी नेते





