Pune District :ऊस पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

गोनवडी परिसरात शेतकरी हैराण ः
मंचर – गोनवडी (ता. आंबेगाव) परिसरात उस पिकाला लोकरी माव्याचा पादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहे. साखर कारखान्याच्या शेती विभाग आणि शासनाच्या कृषी विभागाने शेतकर्यांना मार्गदर्शन करावे. अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
गोनवडी येथील शेतकरी संतोष एकनाथ भास्कर म्हणाले शेतीमध्ये अनेक प्रकारची रासायनिक खते औषधे फवारून किड नियंत्रित येत नाही. शेतकर्यांनी कसे जगायचे. निसर्ग साथ देत नाही. आमच्यावर असणारे कर्ज कसे फेडायचे अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
इतर शेतकरी म्हणाले की जे कारखाने आम्हाला ऊस बियाणे देतात. त्यांनी आम्हाला उसावरच्या लोकरी मावा कीड हटवण्याचे मार्गदर्शन करण्यात यावे. तर आम्ही ऊस पिक वाचू शकतो. अन्यथा या किडीच्या पादुर्भावामुळे आम्ही कर्जबाजारी होऊन आमच्या ऊसाला कवडी मोल बाजार भाव मिळेलच. अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहे.
ही कीड लोकरी मावा आहे. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असताना फोरेट 1किलो व युरिया घेऊन ज्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतो. त्या ठिकाणी टाकावे. बारीक निरीक्षण करून पाहिलेस मावा खाणारी परभक्षी कीटक दिसून आली तर पानावर कोणतीही कीटकनाशक ची फवारणी करू नये. अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा.
-दिनकर आदक, ऊस पुरवठा अधिकारी, भीमाशंकर साखर कारखाना पारगाव.





