Pune District : युवतीचा मोबाइलवरुन विनयभंग
Updated On:

शिक्रापूर : पिंपळे जगतापमध्ये युवतीचा मोबाइलवरुन विनयभंग केला. पिंपळे जगताप येथील युवती घरी असताना विशाल इंगळे या युवकाने युवतीच्या मोबाइलवर फोन करुन युवतीशी अश्लील शब्दात संभाषण करीत युवतीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले.
दरम्यान युवती चिडून त्याला ओरडू लागली असता विशाल याने युवतीला शिवीगाळ, दमदाटी करीत युवतीचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी दिली. याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी विशाल नवनाथ इंगळे (रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





