Pune District : शिवकालीन शस्त्रांचे भवानीनगरमध्ये प्रदर्शन

भवानीनगर : येथे शिवछत्रपती ग्रुप संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त आज श्री भवानीमाता मंदिरामध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, एडवोकेट सचिन वाघ, डॉ रमेश भोईटे, डॉ नंदकिशोर साळुंखे, ऍड हरिष कुंभारकर उद्योजक दिलीप भापकर, ऍड योगेश वाघ कार्यक्रमचे प्रयोजक्तव गणेश मोरे, व्ही. एम. जी. ग्रुप चे चेअरमन शास्त्रगार अभिजित धोत्रे त्याच प्रमाणे शशिकांत निंबाळकर, अमर फुके, प्रकाश पवार, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विनोद बोबडे, नितीन सपकळ, रोहन चव्हाण, प्रविण ननवरे, सुरज निंबाळकर, अजय सोनवण, दत्ता पवार, दिलीप पवार आदी तरुण उपस्थित होते.
यावेळी शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची शौर्यगाथा शस्त्र संग्राहक अभिजीत धोत्रे यांनी या ठिकाणी भरविले त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील लढाईमध्ये जे जे शस्त्र वापरले त्या शास्त्रामध्ये बंदुकीची नळकांडी, ब्रिटिशकालीन बंदूक, ठासणी बंदूक, संगीन ( बंदुकीला लावण्यासाठी) बारूद दानी, फरशी कुर्हाड, बळीची कुर्हाड, हत्तीचा पाय तोडण्याची कुराड, भाल्यांचे विविध प्रकार, सीरोही कट्यार, पोलादी ढाल, वाड्यांना लावण्याची कुलपे, तलवारी, कट्यार, किल्ल्यांच्या दरवाजांना लावण्याची कुलपे, वाघ नखे, अंकुश,
विविध प्रकारचे अडकिते, गुप्ती, मुघल कट्यार, लहान मुलांची कट्यार, विजय नगरी कट्यार, मराठा तलवार, मराठा कट्यार, तेगा तलवार, गोलिया तलवार (पंजाब) राजपूत तलवारी, जगदंबा हातकडी, अशा विविध वस्तूंचे या ठिकाणी भव्य अशी मांडणी करून जे काही शिवाजी महाराजांच्या काळात या हत्यारांच्या साह्याने युद्ध केले होते त्या हत्यारांची माहिती यावेळी अभिजीत धोत्रे यांनी दिली.





