Pune District: कोणी गटविकास अधिकारी देता का?

सासवड : पुरंदर तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत असलेले दुष्काळाची तीव्रता त्याचबरोबर अनेक गावांत पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली असून पंचायत समिती समोर होणारी अनेक आंदोलने उपोषणे त्याचबरोबर नागरिकांचे प्रश्न सोडवणुकीसाठी पुरंदर पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुरंदर पंचायत समितीमध्ये सध्या अतिरिक्त पदावर गटविकास अधिकारी म्हणून पंकज शेळके हे कामकाज पाहत असून त्यांच्याकडे पुरंदर अशा दोन पंचायत समितीचा कार्यभार असल्यामुळे अनेक वेळा प्रवासामध्ये देखील मोठा वेळ जात असल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत.
पुरंदर पंचायत समितीमध्ये तात्कालीन गटविकास अधिकारी डॉ अमिता पवार यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यभार हा वेल्हे येथील गटविकास अधिकारी पंकज शेळके यांच्याकडे देण्यात आला; परंतु आठवड्यातील सोमवार व गुरुवार या दोनच दिवसी गटविकास अधिकारी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असून अनेक ग्रामपंचायत मधून विकासाची कामे सुरू आहेत; परंतु विकासात्मक कामे करीत असताना गटविकास अधिकार्यांच्या शिफारसी आवश्यक असतात; परंतु गटविकास अधिकारी पूर्णवेळ नसल्यामुळे या विकासकामांना अनेक वेळा अडचणी येत आहेत. पुरंदर पंचायत समितीमध्ये अनेक उपोषणे आंदोलने होत असतात; परंतु गटविकास अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या आंदोलन करताना गटविकास अधिकार्यांचे सोमवार व गुरुवारपर्यंत वाट पाहावी लागत आहे, यामुळे आंदोलन उपोषणे अनेक वेळा सुरूच राहतात. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो
जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुरंदर पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळण्यासाठी प्रयत्न करू
– प्रा. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमाझ्याकडे पुरंदर पंचायत समितीचा अतिरिक्त कार्यभार असून वेल्हे पंचायत समिती चा पूर्ण वेळ पदभार आहे.
– पंकज शेळके, गटविकास अधिकारी, पुरंदर पंचायत समिती





