Indapur : ‘कर्मयोगी’च्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील
Indapur : या कारखान्याची 2026-2031 ची पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली.

इंदापूर : महात्मा फुलेनगर, बिजवडी (ता. इंदापूर ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग 4 थ्या वेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी छगन भोंगळे यांची बिनविरोध निवड गुरुवारी (दि. 12) झाली.
या कारखान्याची 2026-2031 ची पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली. कारखान्याची ही सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर कारखान्याचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षपदासाठी छगन भोंगळे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी, उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी केली.
यावेळी संचालक राजवर्धन पाटील, वसंत मोहोळकर, पराग जाधव, शांतीलाल शिंदे, रविंद्र सरडे, राकेश शुक्ला, निलेश देवकर, राजेद्रकुमार देवकर, संतोष काळे, श्रीकांत देवकर, विजय खर्चे, रणजित निकम, रोहित गायकवाड, बिभिषण नलवडे, अतुल शिंगाडे, हरिश्चंद्र पारेकर, अमोल जाधव, रत्नमाला पवार, सुमन व्यवहारे उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पाडणेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यशवंत माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने, हनुमंतराव कोकाटे, अविनाश घोलप, तेजसिंह पाटील, अशोक घोगरे, डी. एन. जगताप आदींसह सर्वपक्षीय नेते, शिवसेना ठाकरे गट, शेतकरी संघटना व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार ओमराजे बोत्रे-पाटील, लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, जयकुमार कारंडे, गोविंद रणवरे, अँड. मनोहर चौधरी, पिंटू काळे, उत्तम जाधव, विक्रांत कोरटकर, मनोज मोरे, अशोक शिंदे, आबासाहेब शिंगाडे, सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, किरण पाटील, महादेव शेंडगे, अंकुश पाडुळे, कार्यकारी संचालक विजय शिर्के, जनरल मॅनेजर रणजीत तावरे आदींनी केला. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले.





