मंचर – निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयडील स्टडी’ हे मोबाईल अॅप मराठीतून आणि सेमी इंग्लिश मधून सर्व विषयांचा अभ्यास करण्यासाठी मोफत देण्यात आले. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष संतोष गिरंजे यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना अभ्यासात्मक उजळणी करण्यासाठी आणि अवघड विषय सोप्पे करून देण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून महाराष्ट्रभर उपलब्ध आहे. मात्र, पालकांची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. की, ज्यामुळे मुले मोबाईल अँपचा योग्य वापर करतील, असे या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष संतोष गिरंजे यांनी सांगितले व सविस्तर माहिती दिली व पालकांशी संवाद साधला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे पाटील तसेच इतर सर्व विषय शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. …….