पुणे जिल्हा : जातेगावमध्ये कर्मचाऱ्यांसह डोंबाऱ्यांची दिवाळी गोड

शिक्रापूर – जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचाऱ्यांना बोनससह मोठी वाटप करीत सर्व अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका तसेच डोंबरी समाजाला मिठाई वाटप करण्यात आल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह डोंबाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
जातेगाव बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस वाटप करीत गावातील सर्व अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस, आशासेविका, दिव्यांग बांधव यांसह गरजू डोंबारी समाजाच्या नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच निलेश उमाप, ग्रामपंचायत सदस्या शोभा इंगवले, तंटामुक्तीचे समिती अध्यक्ष अनिल होळकर, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ इंगवले, आप्पासाहेब मोरे, पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत दीपावलीमध्ये होणाऱ्या अनाठाई खर्चावर प्रत्येकाने अंकुश ठेवून गोरगरीब व गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी गोड करणे गरजेचे असल्याचे मत सरपंच निलेश उमाप यांनी व्यक्त केले.





