पुणे जिल्हा : खेडमधील गरिबांची दिवाळी गोड

आनंदाचा शिधा रेशन दुकानांत वितरणास सुरुवात
राजगुरूनगर :खेड तालुक्यात गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येत असून त्याचा रेशन धारकांना लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे पुरवठा अधिकारी जी, एस, रोकडे यांनी केले आहे.
रेशनिंग धान्य वाटपात खेड तालुका जिल्ह्यात पुढे आहे.तालुक्यात 188 स्वस्त धान्य दुकाने असून 59 हजार 100 लाभार्थी आहेत. अंत्योदय लाभार्थीसाठी महिन्याला 48 मेट्रिक टन गहू, 64 मेट्रिक टन तांदूळ वाटप केला जातो. प्राधान्य लाभार्थीसाठी 552 टन गहू तर 828 टन तांदूळ वाटप केला जातो.
गरिबांची दिवाळी गोड जावी यासाठी सरकारने आनंदाचा शिधा वाटप केला जात असून 188 पैकी 70 पेक्षा जास्त धान्य दुकानात त्याचे वाटप सुरु झाले आहे. तर उर्वरित दुकानात पुढील तीन- चार दिवसात आनंदाचा शिधा पोहोचणार आहे.
यात 1 किलो साखर, 1 पुडा तेल, अर्धा किलो रवा,अर्धा किलो पोहे, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो चणाडाळ असे 100 रुपयांत आनंदाच्या शिधाचे वाटप केले जात असल्याचे क्लार्क गणेश रोडे यांनी सांगितले





