पुणे जिल्हा: दिवसाढवळ्या पळवली दागिन्यांनी भरलेली बॅग
Pune District:
Updated On:

उंब्रजमधील घटना : सराफाने पाठलाग करूनही चोरटा पसार
कराड : उंब्रज (ता. कराड) येथील चोरे रोड परिसरात सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली.
उंब्रज येथील श्री वाग्देवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव- चोरेकर यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेला चोरटा सुमारे अडीच लाखांची रक्कम, आठ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे पाच किलो चांदी असा मोठा ऐवज घेऊन पसार झाला.
गणेश यादव यांनी तत्काळ चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, तो वेगाने निसटला. घटनास्थळी उंब्रज पोलीस दाखल झाले असून तपास करत आहेत.





