Pune District : प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्या

भोर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नवीन घरकूल मंजूरीकरीता भोर नगर परिषद हद्दीमधील इच्छूक लाभार्थ्यांनी भोर नगरपरिषद कार्यालयामध्ये अर्ज सादर करावेत, असे आवाहन भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले आहे.
या योजनेसाठी भारतामध्ये लाभार्थी तसेच कुटूंबामधील इतर सदस्यांच्या नावे पक्के मकान नसावे, लाभार्थ्याने गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल तीन लक्ष रुपये असावे, अशी पात्रता आहे.
या योजनेसाठी अर्जदाराचे मोबाईल नंबर लिंक असलेले आधारकार्ड, तहसीलदार यांचे उत्पन्नाचे चालू वर्षाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, बँकेचे आधार लिंक असलेले प्रमाणत्र, जमिनीचे पुरावे (सातबारा, आखिव पत्रिका, मालमत्ता पत्रक, मोजणी नकाशा इ.) याशिवाय अर्जदार यांचे आई व वडिलांचे आधारकार्ड (हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र), अर्जदार यांचे कुटूंबामधील सर्व सदस्यांचे आधारकार्ड (पती/पत्नी व मुले), पी.एम. स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, पी. एम विश्वकर्मा इ. योजनेचा लाभार्थी असल्यास नोंदणी क्र. प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
संपूर्ण कागदपत्राच्या मुळ प्रतीसह प्रधानमंत्री आवास योजना योजनेमध्ये लाभ घेण्याकरीता अधिक माहितीकरीता भोर नगरपरिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, भोर येथे संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.





