Pune District : माऊलीं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
Updated On:

आळंदी : षट्तीला एकादशी निमित्त शनिवारी (दि. 25) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊली मंदिरात हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती.
तसेच एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.भाविक भक्तांसाठी मंदिरात उपवासाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
इंद्रायणी नदी घाटावर सुद्धा भाविकांची गर्दी दिसून येत होती. पवित्र इंद्रायणी मातेची काही भाविक पूजन करत होते. सिद्धबेट येथे अजान वृक्षाच्या शीतल छायेत काही भाविक पारायण करत होते.





