Pune District : वाढत्या उन्हाने शेतीकामांचा खोळंबा
Updated On:

कळस : येथील परिसरात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यंदाचा उन्हाळा हा नेहमीपेक्षा तीव्र जाणवेल, असा अंदाज सर्वजण व्यक्त करीत आहेत.
सध्याच्या वाढत्या उष्णतेचा परिणाम मानव, पक्षी, प्राणी या सर्वांच्या दैनंदिन जीवनावर होण्यास सुरुवात झाली आहे. दुपारी शेतात शेतमजूरवर्ग हा उष्णतेमुळे विश्रांती घेताना दिसून येत आहे. तर शेळ्या-मेंढ्यादेखील झाडाखाली विश्रांती घेत आहेत.
दुचाकीवरून प्रवास करताना नागरिकांना डोक्यावर टोपी परिधान करून व तोंडाला रुमाल बांधावा लागत आहे. सकाळी दहा साडेदहापासूनच अंगाची लाही लाही होण्यास सुरुवात होते.
या पार्श्वभूमीवर सर्वत्र उकाड्यापासून बचाव करण्यासाठी आता सरबत, लस्सी, ताक, मठ्ठा यांना मागणी वाढत चालल्याचे चित्र ठिक ठिकाणांहूनच्या दुकानात पहावयास मिळत आहे.





