Pune District : श्रीक्षेत्र भुलेश्वरमध्ये प्रशासनाचा हजगर्जीपणा

श्रावण यात्रा नियोजन बैठकीत ग्रामस्थांनी वाचला पाढा
वाघापूर – पुरंदर तालुक्याईल माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे श्रावण यात्रा नियोजनाची बैठक पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रामुख्याने ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या हालगर्जीपणाचा पाढा वाचला.
यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावर पडलेले खड्डे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा याठिकाणी ग्रामपंचायत सदस्य शरद यादव यांनी उपस्थित केला. तसेच पीएमपीएमएल बस सेवा सुरू व्हावी व माळशिरसचे नाव हे श्रीक्षेत्र भुलेश्वर माळशिरस व्हाव, अशी त्यांनी केली. तसेच येणार्या भाविकाना ग्रामपंचायतकडून मुबलक अशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असून पूजा व अभिषेकासाठी जे मान्यवर मंडळी येतील त्यांनी वेळेत यावे, असे आवाहन माजी उपसरपंच माऊली यादव यांनी केले.
महिला पोलीस बंदोबस्त असावा, रुग्णवाहिका, वैद्यकीय मदत कक्ष,पोलिस कक्ष,तसेच वनविभागात लाईट बसविणे अशा गोष्टींवर विजय शिवतारे यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महावितरणचे जीवन ठोंबरे यांची विजय शिवतारेंनी लोडशेडिंग नको, असे म्हणून फिरकी घेतली, यावेळी उपास्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यावेळी प्रांताधिकारी वर्षा लांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी तान्हाजी बरडे, माळशिरसच्या सरपंच आरती यादव, दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, नितीन कुंजीर, वनविभागाचे ढोले, माजी उपसरपंच माऊली यादव, सदस्य शरद यादव, माजी उपसरपंच अशोक यादव, माजी सरपंच सदाशिव डोंबाळे, अरुण यादव तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.





