Pune District : पुरंदरमध्ये 146 लाभार्थी प्रलंबित
Updated On:

सासवड : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पुरंदर पंचायत समितीकडून 1653 उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे तर 1507 लाभार्थींना मंजुरी देण्यात आली आहे. 146 लाभार्थी प्रलंबित असल्याचे सहायक गटविकास अधिकारी जयराम लहामटे यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 सन 2024-2025 या आर्थिक वर्षातील लाभार्थी मंजुरी आदेश देणे व पहिला हप्ता वितरित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी लहामटे बोलत होते.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजने मधून लाभार्थींना 1 लाख 58 हजार 730 रुपये रक्कम देण्यात येत आहे. यावेळी विस्तार अधिकारी अभिजीत जेधे, गणेश पोमण, आविनाष घोगरे उपस्थित होते.





