खामुंडी व डुंबरवाडी गावात जंतुनाषक फवारणी

ओतूर (प्रतिनिधी) – नगर-कल्याण महामार्गावरील अनुक्रमे खामुंडी व डुंबरवाडी (ता.जुन्नर) या दोन्ही गावच्या ग्रामपंचात प्रशासनाने कोरोनावर मात करण्यासाठी कंबर कसली असून या दोन्ही गावातील गल्ली बोळातून व सर्वत्र जंतूनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. सर्व नागरिकांच्या निरोगी जीवनासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही फवारणी करण्यात आली.
यावेळी घाबरू नका पण जागरूक राहा,कोरोना विषाणू पासून सावधानता बाळगा असा संदेश गावाच्या सरपंच डॉ.माया गंभीर व डुंबरवाडी गावाचे सरपंच तान्हाजी डुंबरे हे प्रत्येक नागरिकाला आवर्जून देत होते.
खामुंडी व डुंबरवाडी गावातून कोरोणा व्हायरसचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून (दि.२४) गावात जंतुनाशक सोडियम हायप्रो क्लोराईडची फवारणी करण्यात आली. या प्रसंगी पोलीस पाटील किरण भोर, प्राथमिक शाळेचे शिक्षक उपेंद्र डुंबरे,खामुंडी ग्रामपंचायत कर्मचारी योगेश शेलार , कौस्तुभ गंभीर,दीपक हुलावळे समीर डुंबरे ,भगवान डुंबरे,लहू मोरे ,सुशांत डुंबरे,सुरज शिंदे, नारायण हुलावळे, ऋषिकेश डुंबरे,डुंबरवाडी ग्रामपंचायत कर्मचारी म्हतु डुंबरे व सोमा दाभाडे यांनी महत्वपूर्ण परिश्रम घेतले. परिश्रम घेणाऱ्या सर्वाप्रती ग्रामस्थांमधून कृतघ्नतेची भावना व्यक्त होत आहे.





