Pune : स्वच्छ पुण्यासाठी शहरात पुन्हा डीप क्लिन ड्राईव्ह

पुणे :महापालिकेच्या स्वच्छ पुणे अभियानाचा भाग म्हणून १ ते ४ जुलै दरम्यान मुख्य वर्दळीचे रस्ते, फुटपाथ, झोपडपट्ट्या, नदीकाठ, सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. उपायुक्त संदीप कदम यांच्या माहितीनुसार या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापनासह अतिक्रमण, आकाशचिन्ह, किटक प्रतिबंध, उद्यान, पथ, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत, शिक्षण, मोटार वाहन व परवाना विभाग सहभागी होणार आहेत. तसेच शालेय, कॉलेजविद्यार्थीही सहभागी होणार आहेत.
मोहिमेत झाडणकाम, डिव्हायडरवरील माती हटवणे, भित्तीपत्रके, अनधिकृत फ्लेक्स काढणे, गवत छाटणे, झाडांची फांदी छाटणे, डासनिर्मूलनासाठी फवारणी, खड्डे बुजवणे, पाणीगळती दुरुस्ती, ड्रेनेज सफाई, विद्युत बॉक्स सुरक्षित करणे, ओपन डीपी बंदिस्त करणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीही मोहिमेत सहभागी होणार असून, आवश्यक वाहने, मनुष्यबळ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पुरवले जाणार आहे.
संपूर्ण मोहिमेचे नियोजन परिमंडळ उपायुक्त करणार असून, सहाय्यक आयुक्त आणि अभियंते प्रत्यक्ष मोहिमेच्या ठिकाणी उपस्थित असतील. स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने महापालिकेने एकात्मिक पद्धतीने ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून मागील वर्षी शहरात ही मोहीम राबविण्यात आली होती.
त्यात एकाच वेळी सर्व विभागांची पथके सहभागी होऊन रस्त्यावर अडथळा ठरणारे सर्व घटक काढले जातात.परिणामी, वाहतूक सुरळीत होण्यासह शहराचे विद्रूपीकरणही रोखणे शक्य होते. त्यामुळे,सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरवून ही मोहीम राबविली जात.





