pune : बहुतांश पिकांचे पंचनामे पूर्ण
pune :
Updated On:

pune : येत्या रविवारपर्यंत पीक नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर शासनाकडे निधीची मागणी करणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पंचनामे करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात महसूल विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत काम सुरू आहे.
गुरुवारी घेतलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश पंचनामे पूर्ण झाले असून, नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतही ६० ते ७० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.





