Pune Crime : न्यायालयासमोर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Updated On:

पुणे : शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयासमोर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हर्षद अप्पा ढेरे ( २२, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्वर शाकीर शेख उर्फ झंब्या, ओंकार दयानंद पवार (दोघे रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षद शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबला होता. त्यावेळी शेख, पवार आणि साथीदार तेथे आले. आरोपींनी माझ्याकडे का बघतो, अशी विचारणा हर्षदकडे केली. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला.
वादातून एकाने हर्षदच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्रााने वार करून तिघेजण पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करत आहेत.





