Pune Crime : महंमदवाडीत टोळक्याची तरूणाला मारहाण
Updated On:

पुणे – मालकीची जागा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण करून त्याच्याकडील पाच हजारांची रोकड लुटल्याची घटना महंमदवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये घडली. याप्रकरणी तरूणाने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सहा ते सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरूणाची महंमदवाडीतील लक्ष्मीनगरमध्ये मोकळी जागा आहे. दोन दिवसांपुर्वी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी तरूण मित्रांसह त्याठिकाणी गेला होता. त्यावेळी तेथे आलेल्या टोळक्याने तरूणाला पुन्हा त्याठिकाणी न येण्याची धमकी देउन मारहाण केली.
त्यामुळे परिसरातील नागरकिांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर टोळक्याने तरूणाला दुचाकीवर बसवून दुसऱ्या ठिकाणी नेउन मारहाण करीत खिशातील पाच हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर तपास करीत आहेत.





