Pune Crime: पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले; शेवाळवाडी – स्वारगेट प्रवासादरम्यानची घटना
Updated On:

पुणे – पीएमपी प्रवासी महिलेकडील 50 हजारांचे दागिने लांबविल्याची घटना स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शेवाळवाडी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक एम. बी. कांबळे तपास करत आहेत.





