Pune Crime : देवघरात चोरी! देवीच्या गळ्यातील दहा लाखांचा राणीहार लंपास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नवरात्रोत्सवाची धामधुम सुरू असतानाच चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील दहा लाखांचा सुवर्णहार चोरून नेला आहे. कात्रजमधील सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात ही घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.फिर्यादनुसार सुखसागरनगरमधील एका बंगल्यात देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान केला होता. २४ सप्टेंबर रोजी दुपारी चोरटे बंगल्यात शिरले. त्यांनी मूर्तीवरील दहा लाखांचा सोन्याचा राणीहार लांबविला.
फिर्यादी पुजेसाठी देवघरात गेले तेव्हा राणीहार चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.भरदिवसा बंगल्यातील सुवर्णहार चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. फरार चोरट्यांचा शोध सुरू आहे.





