Pune Crime – शाळेत सोडण्याची बतावणी करुन अल्पवयीन मुलीवर मोटारीत बलात्कार करण्याची धक्कायक घटना घडली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा पिडीत मुलीच्या आईचा मित्र आहे. ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर ( २९, रा. पोळ काॅलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे आरोपीचे नाव असून तो कार चालक आहे. नुकतीच त्याने एक सेकंड हॅण्ड कार विकत घेतली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या नुसार, आरोपीला पिडीत मुलगी ओळखत होती. पिडीत मुलगी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी शाळेत चालली असता आरोपीने तिला मोटारीतून शाळेत सोडतो, असे सांगून गाडीत घेतले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर मोटार थांबविली आणि धमकावून बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याची माहिती आईला दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली.