Rohini Khadse And Chitra Wagh : ‘काळ्याकुट्ट भुवया घेऊन…’ रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर
Rohini Khadse And Chitra Wagh : 'हम किसी को छेडते नही... और अगर किसीने छेडा, तो छोडते नही' चित्रा वाघ यांचा इशारा

Rohini Khadse And Chitra Wagh : पुण्यात गेल्या सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला असून ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले आहेत. MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी आंदोलक विद्यार्थ्यांची आहे. अनेक नेतेमंडळींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहत भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. ‘काळ्याकुट्ट भुवया घेऊन… अगं बाई तू ये’ अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना सुनावले होते.
यावर आता सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी पोस्ट करत म्हटलं की, “खरं तर कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं आम्हाला आवडत नाही, पण जेव्हा रोहिणी खडसे राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडतात, तेव्हा त्यांना आरसा दाखवावाच लागतो! MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर खालच्या पातळीत बोलण्यापेक्षा, रेव पार्टीत नाव आलेल्या पतीच्या प्रकरणांवर उत्तर द्या! आमचा नियम स्पष्ट आहे, “हम किसी को छेडते नही… और अगर किसीने छेडा, तो छोडते नही!”
खरं तर कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं आम्हाला आवडत नाही, पण जेव्हा रोहिणी खडसे राजकीय टीकेच्या सर्व पातळ्या ओलांडतात, तेव्हा त्यांना आरसा दाखवावाच लागतो! 🚨
MPSC च्या विद्यार्थ्यांसमोर स्वस्त टाळ्या मिळवण्यासाठी दुसऱ्या महिलेवर खालच्या पातळीत बोलण्यापेक्षा, रेव पार्टीत नाव आलेल्या पतीच्या प्रकरणांवर उत्तर द्या!
आमचा नियम स्पष्ट आहे
“हम किसी को छेडते नही… और अगर किसीने छेडा, तो छोडते नही!” 💥👊@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@RaviDadaChavan @cbawankule#SadetodUttar #MaharashtraPolitics #MPSC #TruthExposed #MahaPolitics
#ncpspeaks #sharadpawar #supriyasule #ChitraWagh— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 7, 2026
रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
आंदोलनस्थळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, “हे वाघाचे काळीज घेऊन तुम्ही पठ्ठे एवढं आंदोलनाला बसलेत याच्यामुळे या सरकारमधल्या प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकली, तर सोपं आहे का? त्या काळ्या कुट्ट नकली भुवया घेऊन घेऊन, रेकॉर्ड करून विचित्रताई येते, आणि नंतर सांगते की हे जे आंदोलन चाललंय हे आंदोलन नौटंकी आहे, अगं बाई तू ये, इथे ये जेव्हा तू, महिला आहेत आपण चांगलंच बोलूयात, आदराने बोलूयात पण काय माहितीय का?
आदरणीय ताईंना पायाला 56 बांधून फिरायची सवय त्याच्यामुळे त्यांना आपल्या आंदोलनकर्त्यांची तळमळ, आपलं जो जीव जळतोय ना, जेव्हा पेपर फुटतो,आपल्या आई वडिलांनी आपल्याला अर्धी भाकरी खाऊन जे मोठं करत परीक्षेमध्ये आपण पास जी आशा असते ना आपल्या आई वडिलांची ती आशा नाही कळणार यांना, पायाला 56 बांधून फिरणं सोपं असतं, पण अर्ध पोट ठेवून एखाद्या लेकराला मोठं करायचं त्याला अधिकारी बनताना पाहायचं जे सुख असत ना ते आईबापांच स्वप्न जर कोणी पाई तुडवत असेल तर आपण हे आंदोलन करून या सरकारला जाब विचारायचा अधिकार आपल्याला आहे,” असंही पुढे रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
Rohit Pawar : MPSC आंदोलनाला कोर्टात आव्हान; रोहित पवारांचा संताप, थेट म्हणाले ‘कितीही दम लावा…’





