Pune Crime | अॅप सुरू करून देतो म्हणत घेतला ओटीपी ; वृद्धाची लाखोंची फसवणूक

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – वाघोली 72 वर्षीय वृद्धाला फोन करून बँकेचे बंद पडलेले अॅप चालू करून देतो असे सांगून ओटीपी घेऊन सायबर चोरट्याने दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वृद्धाला फोन सायबर चोरट्याने फोन करून बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे बँकेचे बंद पडलेले अॅप चालू करून देतो असे सांगून ओटीपी शेअर करण्यास सांगितले.
वृद्धाने खात्री केली असता अॅप बंद असल्याचे दिसले तसेच त्या व्यक्तीच्या व्हाटसअॅपवर बँकेच्या लोगो असल्याचे दिसला. पुन्हा फोन आल्यावर ओटीपी सांगितला असता वृद्धाच्या खात्यातून 2 लाख रुपये गेले असल्याचे समजले. बँकेला कळवून स्टेटमेंटवर माहिती घेतली असता ओरिसा येथील मानस कुमार जेता याच्या खात्यात पैसे गेल्याचे कळले. जेता याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत.





