Pune Crime | मेट्रो प्रवासात महिलेशी अश्लील वर्तन; ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मेट्रो प्रवासी महिलेशी अश्लिल वर्तन करणाऱ्या एकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मूळचा बिहारमधील मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास मेट्रोतून प्रवास करत होत्या.
त्या वेळी आरोपीने महिलेकडे एकटक पाहून इशारे केले. त्याने महिलेची मोबाइलमध्ये छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. प्रवाशाला ताब्यात घेऊन मंडई पोलीस चौकीत आणण्यात आले. या प्रकरणी ६५ वर्षीय प्रवाशाविरुद्ध अश्लिल वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.





