Pune Crime | किरकोळ वादाचा हिंसक शेवट ; युवकावर रस्त्यात कोयत्याने हल्ला
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – येथे पुणे-नगर महामार्गावर किरकोळ वादातून एका युवकाला कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन आरोपींसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.विशाल तळेकर (वय ३६, रा. करंदी) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना, त्यांना ओळखीच्या हर्षल शिंदे आणि सौरभ शिंदे (दोघे रा. फुलगाव, ता. हवेली) यांनी थांबवले.
‘गाडी नीट चालवता येत नाही का’ असे म्हणत त्यांनी विशालला शिवीगाळ करत कोयत्याने वार करून जखमी केले.याबाबत विशाल तळेकर यांच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी हर्षल शिंदे व सौरभ शिंदे आणि यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार बापू हाडगळे करत आहेत.





