पुणे शहरात लुटमारीच्या घटनांत वाढ; हडपसर भागात तलावरीने वार करून 3 लाखाचा ऐवज लुटला
Updated On:

पुणे – हडपसर ग्लायडिंग सेंटरच्या आवारात फिरायला गेलेल्या एकावर तलवारीने वार करून त्याच्याकडील सोन्याचे कडे, साखळी, रोकड असा तीन लाख 23 हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत बबलुसिंग टाक (39, रा. हडपसर) जखमी झाले आहेत. टाक यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसर ग्लायडिंग सेंटरच्या मैदानावर नागरिक दररोज सकाळी आणि सायंकाळी व्यायामाला येतात. दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वानऊच्या सुमारास मैदानावर टाक यांना तिघांनी अडवले. चोरट्यांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून डोक्यावर वार केला. टाक यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याचे कडे, खिशातील 35 हजारांची रोकड असा तीन लाख 23 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर तपास करत आहेत.





