Pune Crime | येरवडा भागात किरकोळ वादातून मोटार पेटवली; 2 अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात
Updated On:

पुणे : किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांनी एका महिलेची मोटार पेटवून दिल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला आणि अल्पवयीन मुले एकाच भागात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुले त्रास देत असल्याने तिने या भागातील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे मुलांची तक्रार केली होती. त्यानंतर मुलांनी पहाटे पावणेचारच्या सुमारास महिलेची मोटार पेटवून दिली. मोटारीचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे तपास करत आहेत.





