Pune Crime : गारवा हाॅटेलच्या व्यवस्थापकावर तीक्ष्ण शस्त्राने वार
Updated On:

पुणे – उपाहारगृह व्यवस्थापकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील ऊरळी कांचन परिसरात घडली. रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. जावजी बुवाची वाडी, ता. दौंड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत संतोष आखाडे (वय ४७) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आखाडे ऊरळी कांचन परिसरातील गारवा हॉटेलमध्ये व्यवस्थापक आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ते उपाहारगृहाच्या बाहेर खुर्चीवर बसले होते. त्या वेळी दुचाकीवरून दोघेजण आले. अचानक एकाने आखाडे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. हल्ल्यात आखाडे गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत.





