Israel News : हमासच्या वरिष्ठ कमांडरचा इस्रायलकडून खात्मा
इस्रायली सैन्याने गाझाच्या दक्षिणेकडडे रात्रभरात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये (Israel News) हमासचा वरिष्ठ कमांडर ठार झाला. हमासच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Israel News : इस्रायली सैन्याने गाझाच्या दक्षिणेकडडे रात्रभरात केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये (Israel News) हमासचा वरिष्ठ कमांडर ठार झाला. हमासच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. समीर मोहमुद हसन अबू युनिस असे या कमांडरचे नाव असून तो हमासच्या रफाह ब्रिगेडशी संबंधित होता. शनिवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये अबू युनिस मारला गेला.
हमासची फेरउभारणी करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी तो मार्गदर्शक सूचना करत होता. दोनच महिन्यांपुर्वी त्याच्या आगोदरचा कमांडर देखील इस्रायलच्या हल्ल्यात (Israel News) मारला गेला होता. हमासच्या अन्य दहशतवाद्यांवरही रविवारी हल्ले करण्यात आल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. पण या हल्ल्यांचा कोणताही तपशील दिला गेला नाही.
दरम्यान बहरिनमधील हेलिकॉप्टर बेसवरील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा दावा रिव्होल्युशनरी गार्डने केला आहे. मात्र या दाव्यावर अमेरिकेच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. मध्यपूर्वेत तैनात असलेल्या अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शुक्रवारी इराणने बहरिनच्या दिशेने डागलेली दोन ड्रोन हवेतच अडवण्यात आली, असे सेंटकॉमने म्हटले आहे.
मात्र इराणने बहरिनमधील रडार सिस्टीम उडवल्याचा दावा फेटाळला आहे. येमेनमघील बंडखोरांच्या ताब्यातील सना या राजधानीच्या शहरात झालेल्या हवाई हल्ल्यात दोन महिला आणि दोन मुले जखमी झाले, असे हौथींच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.. हा हल्ला सौदी अरेबियाने केला होता, असे हौथींनी म्हटले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात ४ जण ठार झाल्याचे हौथींचा प्रवक्त्ता अनीस अल-असबाही याने म्हटले आहे. तर हौथींनी सौदीची राजधानी रियाधच्या दिशेने डागलेली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखली गेल्याचे सौदी अरेबियाने म्हटले आहे. याशिवाय सौदीचा तेल साठा असलेल्या पूर्वेकडील भागाच्या दिशेने डागलेली दोन ड्रोनही पाडण्यात आली.
जॉर्डनमध्ये तिघांना फाशीची शिक्षा
ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चवर गोळीबार केल्याबद्दल जॉर्डनने तीन जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या महिन्यात २३ ऑक्टोबर रोजी जॉर्डनची राजधानी अम्मानपासून ९० किलोमीटर अंतरावरच्या कारक शहरात या चर्चमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या दहशतवादी हल्ल्यात ९ जण ठार झाले होते आणि डझनभर जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी दोन भाऊ आणि त्यांच्या मेव्हण्याला अटक करून दोषी ठरवण्यात आले होते.
सुरक्षा दलांच्या गोळीबारात हे तिघेही जखमी झाले होते. हे तिघेही कट्टरवादी विचारांनी प्रेरित असल्याचे जॉर्डनच्या प्रशासनाने म्हटले आहे. मात्र ते कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीत. चर्चमधील गोळीबाराची कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यानंतर (Israel News) जॉर्डनने दक्षिण सीरियामध्ये हवाई हल्ले केले होते. पण जॉर्डनमधील हल्ल्याचा आपल्या भूभागाशी काहीही संबंध नसल्याचे सीरियाने म्हटले होते.






