Pune Crime: मद्यप्राशन केल्यानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून एकाचा डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून करण्यात आल्याची घटना येरवडा येथील कामराजनगर खड्डा मज्जित परिसरात घडली. माशक गाजीबक्ष विजपुरे (वय 40, रा.गजराज चौक) असे खून झालेल्याचे नाव आहे. तो केटरींगचा व्यवसाय करत होता. याप्रकरणी, गणेश वसंत शिंदे याला अटक केली आहे. तो पेंटरचे काम करतो. ही घटना शनिवारी (दि.14) दुपारी पावने तीन वाजताच्या सुमारास कामराज नगर खड्डा मज्जित परिसरात घडली. याप्रकरणी, रात्री उशीरापर्यंत आरोपी गणेश शिंदे याच्या विरुद्ध लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत बोलताना लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी सांगितले, माषत विजपुरे आणि आरोपी गणेश शिंदे हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. मद्यप्राशन केल्यानंतर दोघे कामराज नगर खड्डा मज्जित परिसरात बसले होते. शिवीगाळ केल्याच्या कारणातू दोघांत वाद झाला. त्यावेळी गणेश याने माशक याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे माशक जागीच कोसळा. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माशक याला उपचारासाठी नजगीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर माशक याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. गणेश शिंदे याने हा खून केल्याचे समजता लक्ष्मीनगर पोलिसांनी अवघ्या दीड तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.