Pune Crime : पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

पुणे – देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसांनी सिंहगड रस्ता भागात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. राहुल चंद्रकांत पवार (वय २६, रा. नसरापुर, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील दांडेकर पूल येथे एकजण पिस्तुल घेऊन थांबला असून तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गस्त घालणारे तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, शरद राऊत यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, प्रमोद भोसले,राजू जाधव विष्णू सुतार, शिवाजी क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.





