Pune Crime | शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष;ज्येष्ठ महिलेची ४६ लाखांची फसवणूक
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कर्वेनगर भागात राहायला आहेत.
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवत, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी रक्कम मिळाल्याचे आरोपींनी भासविले. प्रत्यक्षात महिलेला परतावा दिला नाही. महिलेने महिनाभरात ४६ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे करीत आहेत.





