Video: आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची काढली धिंड

पुणे – गाडीला कट मारल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जमखी केल्याप्रकरणी दुचाकीवर आलेल्या पाच जणांवर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हेगारांची आज आंबेगाव पोलिसांनी धिंड काढली. त्यांनी ज्या परिसरात गुन्हा केला त्या परिसरात तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांना फिरविण्यात आले. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांना एक प्रकारे संदेश देण्यात आला.
गणेश जाधव, विशाल बंडु राऊत, समीर ज्ञानेश्वर मारणे, ऋषीकेश लोके अशी धिंड काढण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली होती.
Pune Crime: आंबेगाव पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची काढली धिंड pic.twitter.com/zDJoTn6gCy
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) March 14, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी व त्याचा मित्र एका वाढदिवसानिमित्त स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागून रात्री पावणे दहा वाजता चालले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या पाच जणांपैकी एकाने गाडी बाजुला घेण्यास सांगितले. त्यांनी गाडीला कट मारल्याच्या संशयातून दोघांवर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी बांबुने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती.
या आरोपींना कात्रज, संतोष नगर, सच्चाई माता चौक, भगवा चौक, हनुमान नगर, शनी नगर, जांभूळवाडी रोड, पाण्याची टाकी चौक परिसरात फिरविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





