Pune Crime : वैमनस्यातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार
Updated On:

पुणे – वैमनस्यातून युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना ताडीवाला रस्ता भागात घडली. विकी कांबळे (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आरोपी आणि कांबळे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.
दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास त्याला बांबुने बेदम मारहाण करून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अक्षय गोरड तपास करत आहेत.





