Pune Crime : सिग्नलवर थांबलेला तृतीयपंथी तरूणाचे पैशांचे पाकिट घेउन पळाला; घोरपडीतील घटना

पुणे – सिग्नलवर थांबलेल्या तृतीयपंथ्याला 20 रूपये देण्यासाठी पैशांचे पाकिट काढत असताना, एका तृतीयपंथ्यीने तरूणाच्या पाकिटातून 17 हजारांची रोकड चोरन नेली. ही घटना काल सकाळी अकराच्या सुमारास घोरपडीत घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सुरज राघवाचारी (22 रा. वानवडी ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी अकराच्या सुमारास सुरज दुचाकीवरून घोरपडी परिसरातून चालले होते. त्यावेळी आमी पब्लिक स्वूैलच्या गेटपुढे लाल सिग्नल सुरू झाले. त्यामुळे सुरज थांबला असता एका तृतीयपंथ्याने त्याच्याकडे 20 रूपये मागितले.
त्यावेळी पैशांचे पाकिट काढले असता, तृतीयपंथ्याने अचानक सुरजच्या हातातील 17 हजार रूपये काढून घेत पळ काढला. त्याशिवाय दुसऱ्याने त्याला मदत करीत रिक्षात बसून ते पसार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली





