पुणे : ‘कोवोवॅक्स’ लस 90% प्रभावी; आपत्कालीन वापराला ‘डीसीजीआय’ची परवानगी
Updated On:

पुणे- सीरम इन्स्टिट्यूट निर्मिती करण्यात येणाऱ्या “कोवोवॅक्स’ या लसीच्या आपत्कालीन वापराला “डीसीजीआय’ने परवानगी दिली, अशी माहिती “सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.
पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. भारतातील ऍस्ट्राजेनिकाच्या सहकार्याने ऑक्सफर्डची करोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी “कोवोवॅक्स’ लसीची निर्मिती केली असून, त्याच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मान्यता दिली आहे. सध्या 15 वर्षे वयापुढील मुलांना “कोवॅक्सिन’ दिली जात आहे. 15 वर्षे वयापेक्षा कमी असलेल्या मुलांसाठीच्या लसीची चाचणी सुरू असून, तीही प्रभावी असल्याचे सांगत, ती लस लवकरच आणली जाईल, असा विश्वास पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.





