पुणे: “नगरसेवक नाना भानगिरे ‘दिल से’ काम करतात”

हडपसर – करोना महामारीच्या काळात सर्वत्र भीतीदायक व नकारात्मक वातावरण होते. सर्वजण वेगवेगळ्या तणावाखाली होते. मात्र, याला आमचा प्रभाग अपवाद ठरला आहे. कारण येथील नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आमची योग्य ती काळजी घेतली. आम्हीही तेवढीच काळजी घेतली. येथील वातावरण सकारात्मक राहावे, यासाठी वाचनालय, सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहीम यशस्वी राबविले. हे सर्व काम नानांनी ‘दिल से’ केले आहे. अशी भावना न्याती काउंटी रेसिडंट्स फोरमच्या सभासदांनी व्यक्त केली.
निमित्त होते महंमदवाडी येथील जय भवानी चौक ते न्यातीच्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण व सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या लोकार्पण सोहळ्याचे यावेळी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, पुनीता रंजन, दिपा चिमा, दिपा बीड, शुब्रा सिंग,पलक मेहता, ईशानी चौपेला, सकिना पुनावाला, अवंतिका वैलुर, सौम्या माथूर, एलेना मार्शल, अभिमन्यू भानगिरे, हर्षद दातार, राम सिंग, संदीप कोलाटकर, सतीश राजीवडे, सचिन तरवडे, प्रवीण खरात, न्याती काऊंटी रेसिडन्स फोरमचे सर्व सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक नाना भानगिरे यांना आजवर आम्ही जी काही कामे सांगितली ती त्यांनी प्रतिसाद देत तत्काळ पूर्ण केली. अलिकडेच येथील चौकाचे सुशोभीकरण केले. चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आणि आता आमच्या सोसायटीच्या या संरक्षक भिंतीवर वॉल आर्ट केले आहे. त्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ झाला आहे. हे केवळ नगरसेवक नाना भानगिरे हेच करू शकतात, अशा शब्दांत न्याती काऊंटी, न्याती इस्टेट व एनकेल्व्ह तसेच न्याती काउंटी रेसिडंट्स फोरमच्या सभासदांनी कौतुक केले.
सोसायटीतील सदस्य व लहान मुलांनीही या भिंतीवर चित्रे काढून आनंद घेतला. दरम्यान या मुलांच्या आनंदात नगरसेवक नाना भानगिरे हेही सहभागी झाल्याने या चिमुकल्यांचा व त्यांचा पालकांचा आनंद द्विगुणीत झाला होता.
“प्रभाग क्रमांक ४४ व ४६ हे दोन्हीही प्रभाग स्वच्छ व सुंदर असावेत असा माझा मानस आहे. त्यानुसार टप्याटप्याने याभागातील चौक सुशोभीकरण करून आवश्यक त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर वॉल आर्टही करण्यात आले आहे.यामुळे यातून स्वच्छ व सुंदर पुणे असा संदेश जाणार आहे.” – नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे






