Pune Corona Updates: पुणे “करोनामुक्ती’च्या उंबरठ्यावर; आज फक्त दोन अंकी रुग्णवाढ
Updated On:

पुणे – शहरात नव्याने फक्त 44 करोना बाधितांची नोंद करण्यात आली. तिसऱ्या लाटेतील ही सर्वाधिक कमी नोंद आहे. याशिवाय सक्रीय बाधितांची संख्याही कमी झाली आहे.
गेल्या 24 तासांत 131 जणांना डिस्चार्ज दिला असून, आजपर्यंत 6 लाख 49 हजार 921 जण बरे झाले आहेत. 44 लाख 88 हजार 179 जणांचे स्वॅबटेस्ट घेण्यात आले. त्यातील 6 लाख 60 हजार 411 जण बाधित आढळले आहेत. दिवसभरात 2 हजार 649 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली.
1 हजार 145 सक्रीय बाधितांमधील 7 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, तर 65 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. 8 जणांना इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.





