pune : चंद्रकांत पाटील हे कोथरुडचे पालकच

हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांचे प्रतिपादन
कोथरूड – गोरगरीबांच्या अडचणी सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील नेहमीच कार्यरत असतात. सुकन्या समृद्धी, सुखदा, मानसी, शिष्यवृत्ती अशा विविध उपक्रमातून ते लेकींचे पालक झाले आहेत. आता, बॅंक्वेट हॉलच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील मंगल कार्याची तजवीज केली. खऱ्या अर्थाने ते कोथरुडकरांचे पालक आहेत. त्यांचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व हे कोथरुडकरांना नेहमीच भावते, अशी भावना हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून कोथरुडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर परिसरात बॅंक्वेट हॉल उभारण्यात आला, त्याचे लोकार्पण पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गजानन भेलके, उपाध्यक्ष शंकर मोकाटे, सचिव संतोष माथवड,
खजिनदार तानाजी गाढवे, सदस्य पंढरीनाथ दुधाने, महादेव वांभिरे, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, विनय गानू, भाजप कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, कुलदीप सावळेकर, लहू बालवडकर, भाजप महिला मार्चा मध्य मंडल अध्यक्षा हर्षाली माथवड आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदू संस्कृतीत मंदिरातील दानपेटी ही समाजातील गरजूंना मदतीसाठी वापरली जाते. ग्रामदैवत श्री म्हातोबांच्या आशीर्वादाने देवस्थानला समाज कार्यासाठी कधीही पैसे कमी पडले नाहीत. हा हॉल गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी अल्पदरात उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती समितीला केली आहे.





