Pune: रक्तदान सोहळा आणि वृक्ष पुनर्रोपण; आर एम डी फाउंडेशनचा समाजसेवेचा अनोखा संगम
Pune: रक्तदान आणि वृक्ष पुनर्रोपण; जीवन संवर्धानची दुहेरी बांधिलकी - शोभाताई आर. धारीवाल

Pune: शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत गेली चार दशके कार्यरत असलेल्या आर एम डी फाउंडेशनने आता ‘ट्री ट्रान्सप्लान्टेशन’ अर्थात वृक्ष पुनर्रोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण रक्षणातही आघाडी घेतली आहे. रक्तदान आणि वृक्ष संवर्धन या दोन्ही माध्यमांतून जीवन वाचवण्याची आणि भविष्यासाठी शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याची ही दुहेरी चळवळ पुणेकरांमध्ये मोठा उत्साह निर्माण करत आहे.
पुणे रिंग रोड प्रकल्पांतर्गत तोडल्या जाणाऱ्या शेकडो झाडांना वाचवण्यासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत २,५०० हून अधिक वृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले असून त्यात तब्बल ८९ टक्के झाडे जगली आहेत. ही केवळ संख्यात्मक कामगिरी नसून पर्यावरणीय जबाबदारी आणि शाश्वत विकासाप्रती असलेल्या बांधिलकीचे ते प्रत्यक्ष प्रतीक आहे.
रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान सोहळा –
दरवर्षी १ मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आर एम डी फाउंडेशनतर्फे ‘रक्तदान सोहळा’ आयोजित केला जातो. पुण्यातील विविध रक्तदान केंद्रांवर एकाच दिवशी २५,००० हून अधिक ब्लड बॅग्ज संकलित करण्याचा उल्लेखनीय विक्रम फाउंडेशनने यापूर्वी प्रस्थापित केला आहे. मानवसेवेची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सुरू आहे.
दिनांक १ मार्च २०२६, रविवारी हा रक्तदान सोहळा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. जास्तीत जास्त पुणेकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. रक्तदान आणि वृक्ष पुनर्रोपण जीवन संवर्धानची दुहेरी बांधिलकी असल्याचे शोभाताई आर. धारीवाल यांनी म्हंटले आहे.
स्थळ : ६४, आर एम डी बंगला, लेन क्रमांक ३, कोरेगाव पार्क, पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क : ७७६८०२०८०८
रक्तदान आणि वृक्ष संवर्धन या दोन्ही चळवळी अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.





