Pune : भाजप मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया वेळेत पुर्ण करणार – रविंद्र चव्हाण

पुणे – राज्यातील भाजपची संघटनात्मक रचना वेळेत पुर्ण करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांची निवड प्रक्रियाही वेळेत पुर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुण्यातील डीपी रोड येथील सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशात, महाराष्ट्रात संघटन पर्व सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंडलाची रचना पुर्ण करुन पदाधिकारी यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. मंडल अध्यक्ष, जिल्हाधिकारी यांच्या नेमणुका ठरलेल्या मुदतीतच पुर्ण करायच्या आहेत, असे रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
संघटनात्मक रचना येत्या ३० जुलैपर्यंत वेळेत पुर्ण करण्याबाबत पदाधिकारी यांच्या अडचणी जाणुन घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता आढावा बैठकीचे आयोजन केल्याचेही त्यांनी नमूद केले.





