Pune : भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू; चालकाविरुध्द गुन्हा दाखल..
Updated On:

पुणे – कात्रज घाटात भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवशाही बसच्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत मारुती वीर (22,रा.कराड, जि.सातारा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बस चालक संभाजी आत्माराम कुंभार (32,रा.मिरज ,जि.सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे. रोहीत वीर नुकताच हडपसर येथील एका कंपनीत कामाला लागला होता.
रोहीत दुचाकीवरुन साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येत असताना मागून येणाऱ्या भरधाव शिवशाही बसचा त्याला धक्का लागला. यामध्ये रस्त्यावर फेकला गेल्याने डोक्याला आणि हाताला मार लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख करत आहेत.





